Monday, December 29, 2008

माझे मन..

माझे मन..

मना सज्जना भक्तिपंथेची जावे.. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे..

छूकर मेरे मनको किया तूने क्या ईशारा..

मन उधाण वाऱ्याचे.. गुज पावसाचे.. का होते बेभान कसे अडखळते...
मन उधाण वाऱ्याचे...

मेरे मन ये बता दे तू.. किस ओर चला है तू.. क्या पाया नही तूने.
क्या खोया नही तूने..

मनावर आधारित अशी अनेक गाणी आजपर्यंत रचली गेली, अजूनही रचली जातील. पण तरीही कोणाचे मन सहजासहजी ओळखणे मात्र तसे कठीणच. आपल्या मनाचा ठाव स्वत:चा स्वत:लाही कित्येकदा लागत नसतो. मग ईतरांच्या मनात डोकावणे तर महाकठीणच.

मी माझ्या सहवासात आलेल्या काही ब्यक्ति, आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना यांविषयींच्या माझ्या भावना ह्या "माझे मन" या ब्लॉगच्या मार्फत आपणासमोर ठेवणार आहे. मात्र हे लक्षात ठेवा की हे मन एका साध्यासुध्या सर्वसामान्य स्त्रीचे मन आहे. कुणा थोर प्रतिभावंताचे नाही. त्यामुळे इथे आपली एक-एक कवाडं उघडताना ते वेळही लावेल व त्याच्या भावना तशा सुमार शब्दातच असतील, मात्र जे काही असेल ते अगदी मनापसून..

2 comments:

  1. डिसेंबर २००८ मधील हा पोस्ट वाचून खूप छान वाटलं. मंचरकर गुरुजींबद्दल वाचूनही त्यांच्याबद्दल आदर दाटून आला.

    खूप छान लिहीता... लिहीत रहा...

    ReplyDelete
  2. khupach chhan lihila aahes swati. keep it up and keep posted. Best wishes.

    ReplyDelete